कु.दिक्षा तोंडवळकर हीचा माजी खा.निलेश राणेंकडून सत्कार

⚡मालवण ता.१५-: बारावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून ९६.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलेल्या कु.दिक्षा सुमंत तोंडवळकर हीचा भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी वेरळ मुणगेकरवाडी येथील निवास स्थानी भेट घेऊन सत्कार केला.

यावेळी निलेश राणे यांच्या समवेत माजी जि.प.बांधकाम सभापती अनिल कांदळकर ,जिल्हा बँक संचालक संदिप उर्फ बाबा परब,भाजपा मालवण तालुकाध्याक्ष धोंडी चिंदरकर,माळगाव सरपंच निलेश खोत, भाजपा महिला कार्यकर्त्या पूजा वेरलकर, महेश मांजरेकर,दत्तराम आंबेरकर ,जितेंद्र परब, अनंत भोगले,रघुनाथ परब,धनंजय परब,अरविंद परब, भगवान परब, अशोक पोयरेकर, सचिन तोंडवळकर,रविंद्र पोयरेकर,समृद्धि तोंडवळकर, मनिषा कवठणकर , रेश्मा पोयरेकर, विश्वनाथ भोगले, कु.दिक्षाचे वडील सुमंत तोंडवळकर व आई समीक्षा तोंडवळकर, ओंकार तोंडवळकर, पत्रकार अनिल तोंडवळकर व वेरळ गावातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तोंडवळकर परिवारातर्फे माजी खा.निलेश राणे यांचे औक्षण करण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.निलेश राणेंकडून कु.दिक्षा हीचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की कु.दिक्षा तोंडवळकर ही ग्रामीण भागातील विद्यार्थीनी असून तिने बारावीच्या परीक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद असेच आहे. तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबई किंवा पुणे येथे आपण सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी राणे यांनी दिले.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढिल शिक्षणासाठी अवलंबून न राहण्याचा मौलिक सल्लाही राणे यांनी दिला.

You cannot copy content of this page