अबिद नाईक:कसवण तळवडे येथे शेतकऱ्यांना ५०० काजू कलमे वाटप व वृक्ष रोपण
⚡कणकवली ता.१५-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज , फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेऊन पक्ष स्थापनेपासून काम करत आहे . जनतेचे प्रश्न सोडवण्याची व पुरोगामी विकासात्मक वाटचालीची भूमिका पक्षाने नेहमीच जपली आहे . विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे . समाजातील अखेरच्या माणसापर्यंत पोहोचून त्यांना केंद्रस्थानी आणण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून आपणा सर्वांना यापुढेही करावयाचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी नेते व नगरसेवक अबिद नाईक यांनी केले .
कणकवली तालुका राष्ट्रवादीच्यावतीने राष्ट्रवादी पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिन सप्ताहानिमित्त कसवण तळवडे या गावातील शेतकऱ्यांना ५०० काजू कलमे वाटप व वृक्ष रोपण कार्यक्रम राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्या नेतृत्वखाली राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर व माजी तालुका अध्यक्ष विलास गावकर यांनी आयोजित केला होता . यावेळी काजू कलमे वाटप राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष सौ. रेवती राणे यांच्या हस्ते करण्यात आले . तर वृक्षारोपण अबिद नाईक , तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर राष्ट्रवादी जेष्ठ नेते सावळाराम अणावाकर , रेवती राणे , माजी तालुका अध्यक्ष विलास गांवकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी महिला तालुका अध्यक्षा स्नेहल पाताडे , राष्ट्रवादी व्यापार उद्योग महिला तालुका अध्यक्षा रिया भांबुरे , श्रद्धा गांवकर , माजी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे , कसवण सरपंच श्रीमती तेली , आकेरीचे माजी सरपंच संदीप राणे , सावंतवाडी विधानसभा माजी युवक अध्यक्ष कौस्तुभ नाईक , शहर अध्यक्ष इम्रान शैख , शहर चिटणीस अनीस नाईक शहर उपाध्यक्ष अमित केतकर , माजी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर , गणेश चौगुले , विशाल पेडणेकर , नितीश सावंत , शिवडाव माजी उपसरपंच सतीश पाताडे , सचिन सदडेकर , बाळु मेस्त्री , अंकुश मेस्त्री व शेतकरी बहुसंखेने उपस्थित होते .
अबिद नाईक म्हणाले , भारतीय संविधानाप्रती अढळ निष्ठा आणि समतावादी दृष्टीकोन ही शिदोरी घेऊन आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चालत आहोत . कोणत्याही परिस्थितीत खंबीर , निडर होऊन काम करण्याचे बळ आणि धैर्य शरद पवार यांनी दिले आहे . आपण सर्वांनी ही पक्षनिष्ठा अशीच वृद्धींगत करत सर्वसामान्याना राष्ट्रवादी पक्ष आपला वाटावा असे सुरू केलेले काम अखंडपणे सुरू ठेऊया , असेही ते म्हणाले .