⚡सावंतवाडी ता.१५-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे येथे सोलर लाईट लोकार्पण सोहळा पार पडला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात मनसेच्यावतीने सोलर लाईट लोकार्पण करण्यात आली.
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनानुसार मनसे लॉटरी सेनाध्यक्ष गणेश कदम व सहसंपर्क अध्यक्ष सूर्यकांत मयेकर यांच्या माध्यमातून ही सोलर लाईट देण्यात आली. सदर सोलर लाईटचे लोकार्पण मनसे लॉटरी सेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी उपशहराध्यक्ष शुभम सावंत, गावचे ज्येष्ठ नागरिक प्रभाकर जोशी, आनंद जोशी, फटू जोशी, राजा जोशी, विजय जोशी, विजय जोशी, संदीप केरकर, ओंकार जोशी, काशिनाथ हिरोजी, मधुकर हिरोजी, चैतन्य जोशी, संजय जोशी, साहिल जोशी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.