कणकवली / प्रतिनिधी
कणकवली शहरातील सुतारवाडी येथे घराच्या परिसरात आलेल्या सापाला सर्पमित्र यश वर्दम या युवकाने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सुतारवाडी येथील श्री. चिंदरकर यांच्या विहिरीच्या कठड्यावर शनिवारी सकाळी साप आढळून आला. सुमारे दीड मीटर लांबीच्या या सापाला सर्पमित्र यश वर्दम या युवकाने अमोल उर्फ भुजंग राणे यांच्या मदतीने शीताफिने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सदरचा सर्प बिनविषारी तस्कर प्रजाती मधला असल्याचे सर्पमित्र यश वर्दम याने सांगितले. यश वर्दम या सर्पमित्राने आत्तापर्यंत शेकडो सापांना जीवदान देऊन त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
