Headlines

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी…

इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका:कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त. ⚡कणकवली ता.२४-:इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार,भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आणण्यात आले आहे. या बोटीवर मालवण तालुक्यातील दांडी येथील प्रतीक प्रवीण खोचरेकर हा 23…

Read Full News

कणकवलीत पटवर्धन चौक ते किनई रस्त्यावर बंदिस्त गटार कामाला गती…

स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांशी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी साधला संवाद:रस्त्याच्या डागडुजीचीही दिली ग्वाही.. कणकवली : शहरातील पटवर्धन चौक ते किनई रस्ता या महत्त्वाच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटार बांधकामाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिक तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी नगरपंचायतीच्या विकास कामांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट करत समाधान…

Read Full News

“आमचा आवाज दाबू नका”…

नगराध्यक्षांना अँड. निता सावंत कविटकर यांचा थेट इशारा: आमच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिलीच पाहिजे.. ⚡सावंतवाडी ता.२४-: नगरपालिकेच्या आयोजित कौन्सिल बैठकीत विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शब्दयुद्ध पाहायला मिळाले. विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना नगराध्यक्षांकडून समाधानकारक व समर्पक उत्तरे दिली जात नसल्याचा आरोप करत शिंदे शिवसेना नगरसेविका अँड. नीता सावंत यांनी नगराध्यक्षांना थेट इशारा दिला. यावेळी…

Read Full News

ओसरगाव टोल नाक्याविरोधात सिंधुदुर्गात पुन्हा रणशिंग…

टोलमाफी द्या किंवा पर्यायी राज्य मार्ग द्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा.. कणकवली : ओसरगाव येथील टोल नाका मे महिन्यापासून कार्यान्वित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि टोल मुक्त कृती समितीने पुन्हा एकदा टोलविरोधी भूमिका घेतली आहे. सिंधुदुर्गातील सर्व वाहनांना टोलमाफी द्यावी किंवा ओसरगाव येथे पर्यायी राज्य मार्ग तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे….

Read Full News

कणकवलीत २९ एप्रिलला ‘सकल हिंदू संमेलन’; हिंदू समाज संघटित होण्यासाठी विराट सभेचे आयोजन…

⚡कणकवली ता.२४-:हिंदू धर्म, परंपरा आणि संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने कणकवली शहरात आगामी बुधवारी, २९ एप्रिल २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हे संमेलन पार पडणार आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्मितीच्या ऐतिहासिक घटनेनंतर हिंदू समाजासमोर असलेल्या नवीन…

Read Full News

सिंधुदुर्गात टोल वसुलीला तीव्र विरोध…

संदेश पारकर यांचा महामार्ग प्राधिकरणाला खडा सवाल:टोलमुक्त सिंधुदुर्ग अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे.. कणकवली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ओसरगाव येथे टोल नाका सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. प्राधिकरण दडपशाही, पोलीस बळाचा वापर करून टोल नाका सुरू करणार असेल तर टोलबंदीविरोधात लोकशाही मार्गाने आम्ही लढा देणार आहोत. प्राधिकरणाकडून टोलच्या खाली सिंधुदुर्गवासीयांची आर्थिक लूट करू पाहत आहे….

Read Full News

वादळी वाऱ्याने सावंतवाडीत२१ ठिकाणी झालेल्या नुकसानबाबत केसरकरांकडून मदतीचे आश्वासन…

सावंतवाडी : शहरात रात्री वादळी वाऱ्याने थैमान घालत मोठे नुकसान केले. यानंतर माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी घटनास्थळी जात नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. शहरात तब्बल २१ ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत तहसीलदार यांना ताबडतोब पंचनामा करायला सांगून चक्रीवादळाच्या प्रमाणकाखाली नुकसान भरपाई मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून मदत करण्याच्या सुचना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट…

Read Full News

सावंतवाडीत वादळी वाऱ्याचा कहर…

झाडे कोसळली, पत्र्यांची उडालेली शेड: मोठा अनर्थ टळला.. ⚡सावंतवाडी ता.२४-: शहरात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले आहे. काल‌ रात्री १२ च्या सुमारास वीजांच्या गडगडाटासह वाऱ्यांमुळे झाडं पडण्यासह पत्र्याची शेड उडून गेल्याचे प्रकार सावंतवाडीत घडले. सुदैवाने यात कोणाला गंभीर इजा पोहचली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गुरूवारी सायंकाळपासून तालुक्यात वीजांचा लखलखाट सुरू होता. आंबोलीत पाऊस देखील…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेत जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा…

विकासकामे व योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश.. सावंतवाडी : शहरातील विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यपद्धती अधिक गतिमान करण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवारी सावंतवाडी नगरपरिषदेला भेट देऊन सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला. नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले….

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेत जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा…

विकासकामे व योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश.. सावंतवाडी : शहरातील विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यपद्धती अधिक गतिमान करण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गुरुवारी सावंतवाडी नगरपरिषदेला भेट देऊन सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला. नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले….

Read Full News

You cannot copy content of this page