वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यात शासनातर्फे राबवविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद लाभला. तालुक्यात एकूण 93 केंद्रांवर 2610 बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी या मोहिमेस चांगले सहकार्य केले. शासनामार्फत 2026 मध्ये रविवार 28 जून रोजी ही मोहीम यशस्वीरित्या संपन्न झाली. जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी रेडी येथे, वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे यांनी तुळस येथे व उपसभापती सचिन देसाई यांनी कुशेवाडा येथे, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्ला येथे या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र लिलके यांनी तालुक्यात लसीकरण मोहिमेसाठी पर्यवेक्षण केले. तसेच लसीकरण मोहिमेत शहरी व ग्रामीण स्तरावर कोणत्याही समस्या उद्भवू नयेत या दृष्टीने लक्ष पुरविले. दरम्यान पुढील 3 दिवसात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन शिल्लक राहिलेल्या बालकांना लसीकरण करणार आहेत.
वेंगुर्ला तालुक्यात 2610 बालकांना पल्स पोलिओ लसीकरण
