Headlines

झाडाझुडपांत हरवलेली पायवाट बालगोपाळ मंडळाच्या श्रमदानातून झाली मोकळी

नागझरी परिसराचीही स्वच्छता; सामाजिक बांधिलकीचा आदर्श

मालवण दि प्रतिनिधी

सामाजिक बांधिलकी आणि श्रमदानाची ताकद काय असते, याचा आदर्श आचरा येथील बालगोपाळ मंडळाने पुन्हा एकदा घालून दिला. झाडाझुडपांनी पूर्णपणे व्यापलेल्या परिस्थिती होती त्या मुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शाळेतील विध्यार्थीना  अडचण ठरत होती. ही अडचण लक्षात घेऊन आचरा हायस्कूल ते बाजारपेठ या पायवाटेला सुमारे चाळीस ते पन्नास कार्यकर्त्यांनी श्रमदानातून जंगली झाडे झुडपाणी वेडलेली वाट स्वछ केली . यासोबतच ऐतिहासिक नागझरी तलाव परिसराचीही स्वच्छता करून मंडळाने समाजोपयोगी कार्याची परंपरा कायम राखली.
आचरा वरचीवाडी येथील बालगोपाळ मंडळ आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून आदर्श निर्माण करत आला आहे. अनाथाश्रमात जीवनावश्यक वस्तू दान करणे असो की शैक्षणिक साहित्य वाटप आदी अनेक उपक्रमा मधून आपले समाजाप्रती असलेले योगदान देत आले आहे. आचरा बाजारपेठ ते आचरा हायस्कूल समर्थ नगरकडे जाणारी पायवाट झाडे वेलींनी वेढून गेली होती. यामुळे यावाटेने जाणारे ग्रामस्थ, शेतकरी यांना अडथळा निर्माण होत होता. याबाबत मंडळाच्या पदाधिका-यांनी पुढाकार घेत त्यांना मंडळाच्या सर्व महिला पुरुष, जेष्ठ नागरीकांनी सहकार्य देत संपूर्ण पायवाट मोकळी केली. तसेच आचरे गावच्या नागरिकांना स्वच्छेह स्नानाचा आनंद देणा-या ऐतिहासिक नागझरी तलावाकाठी वाढलेले गवत वेली सफाई करत संपूर्ण नागझरी परीसर स्वच्छ केला. श्रमदानातून केलेल्या त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page