Headlines

अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी किशोर चिटणीस…

⚡सावंतवाडी, ता.२८-: अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग च्या अध्यक्ष पदी किशोर चिटणीस यांची नुकतीच निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष पदी डॉ. प्रसाद नावेँकर, सचिव पदी अण्णा म्हापसेकर, खजिनदार पदी जितेंद्र ऊर्फ जितू मोरजकर तर सहसचिव पदी राजू केळुसकर यांची निवड करण्यात आली.

ओंकार तुळसुलकर यांनी जून 2019 मध्ये वैयक्तीक कारणांनी स्वच्छेने राजिनामा दिल्यावर रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाची धुरा डॉ. प्रसाद नावेँकर यांनी निभावली. त्यानंतर आता अध्यक्षपदी किशोर चिटणीस यांची निवड करण्यात आली. पक्ष विरहित सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, स्पर्धा परिक्षा अभ्यासिका विषयक काम करणाऱ्या अभिनव फाऊंडेशन मार्फत येत्या काळात जनतेच्या सहकार्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील. तसेच नवीन कार्यकारी मंडळाची लवकरच घोपणा करण्यात येणार असल्याचे श्री.चिटणीस यांनी सांगितले.
विद्यार्थी चळवळी पासून सुरु झालेल्या अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेने सन 2008 पासून विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतीक उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये माठेवाडा येथील स्पर्धा परिक्षाविषयक अभ्यासिका, अभिनव फाऊंडेशन माफँत आरोग्य विषयक जनहित याचिका, आठवणीतले खेळ हा अनोखा कार्यक्रम, यसंघाच्या पुढाकाराने रुग्ण वाहिका, नरेंद्र डोंगरावर बिजारोपण असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.

You cannot copy content of this page