नगर वाचन मंदिरच्या स्पर्धांमध्ये रोहित डिचोलकर व स्वरदा कदम प्रथम…

,⚡मालवण ता.३१-:*
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे आयोजित सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत रोहित विठ्ठल डिचोलकर याने प्रथम क्रमांक तर परिच्छेद अनुवाद स्पर्धेत स्वरदा मंगेश कदम हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांचे प्रदर्शन ग्रंथालयाच्या वाचन कक्षामध्ये आयोजित करण्यात आले होते. तसेच मालवण तालुक्यातील प्रशालांमधील इ.५ वी ते ७ वी मधील विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी सुंदर हस्ताक्षर व इ.८ वी ते १० वी मधील विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी परिच्छेद अनुवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ग्रंथपाल संजय शिदि यांनी केले. स्पर्धेतील विद्यार्थी विद्यार्थीनींच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे – सुंदर हस्ताक्षर स्पर्धा – प्रथम- रोहित विठ्ठल डिचोलकर, व्दितीय- अनिमिष सुशांत पवार, तृतीय- आर्या संदिप फोंडेकर, उत्तेजनार्थ प्रथम- मीरा संजय वराडकर, उत्तेजनार्थ व्दितीय- मयुरी महेश मेस्त्री. परिच्छेद अनुवाद स्पर्धा – प्रथम- स्वरदा मंगेश कदम, व्दितीय-
तन्मय महेश परब, तृतीय- मानस प्रकाश परब, उत्तेजनार्थ प्रथम- मानसी कमलाकांत मसूरकर, उत्तेजनार्थ व्दितीय- दिव्या काशिराम परब.

या स्पर्धांचे परिक्षण प्रदीप सामंत, संजय शिदि, श्रेया चव्हाण यांनी केले. यशस्वी विद्यार्थी विद्यार्थीनींना शालोपयोगी भेटवस्तु, आणि प्रशस्तीपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा पेडणेकर व रमाकांत जाधव यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शिक्षक व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page