Headlines

कार अपघातात पती-पत्नी जखमी…!

⚡कणकवली ता.२३-:दिवा ते सावंतवाडी जाणारी ईर्टीगा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गानजीक कलंडली. मुंबई – गोवा महामार्गावरील बेळणे खुर्द येथे गुरुवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात सुहास सहदेव माधव व त्यांची पत्नी स्वरा सुहास माधव (दोन्ही मूळ सरमळे, नांगरतास – सावंतवाडी व सध्या रा. दिवा – मुंबई) हे दोघे जखमी झाले. सुदैवाने कारमधील अन्य दोन…

Read Full News

मळेवाड मध्ये अवकाळी पाऊस..

⚡सावंतवाडी ता.२३-:मळेवाड येथे अवकाळी पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली.गेले आठवडाभर वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट उसळली होती.आज गडगडाटासह पावसाने सुरुवात केली.आज सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला.मात्र रस्त्यावर पाणी साचून रस्ते चिखमय बनले होते.तर काही ठिकाणी गुरांसाठी ठेवण्यात आलेले गवत, जळावू लाकडे,या पावसामुळे भिजल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली. तर काही ठिकाणी पादचारी,प्रवासी या…

Read Full News

वेंगुर्ला मठ मठकरवाडी येथे अपघातात देवगड येथील युवकाचा जागीच मृत्यू…

⚡वेंगुर्ला ता.२२-:वेंगुर्ला मठ मठकरवाडी येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.शुभम संतोष गुरव (वय 24,रा. देवगड ) असे त्याचे नाव आहे.तालुक्यातील वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्गांवर गुरुवारी सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे दुचाकी व चारचाकीमध्ये अपघात झाला असून दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान दुचाकी स्लिप होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने…

Read Full News

कुडाळ पं.स. ची २७ ला आमसभा…

तब्बल ७ वर्षांनी होतेय आमसभा:२६ एप्रिल पर्यंत निवेदने देण्याचे आवाहन.. ⚡कुडाळ ता २३-: कुडाळ पंचायत समितीची आमसभा तब्बल सात वर्षानंतर प्रथमच २७ एप्रिलला सकाळी ११ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कुडाळ पंचायत समितीच्या 2025 -26या वित्तीय वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा या आमसभेत घेण्यात येणार आहे. ज्यांना या आमसभेत…

Read Full News

तीन वर्षांचा विज्ञान प्रदर्शन खर्च थकबाकी; शिक्षण समितीत तीव्र नाराजी…

⚡ओरोस ता २३-: चार वर्षे प्रशासकीय राजवट असताना शिक्षण विभागाने जिल्ह्यात झालेल्या विज्ञान प्रदर्शनाचा खर्च केला नसल्याची धक्कादायक बाब गुरुवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत उघड झाली आहे. त्यामुळे २०२६-२७ च्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात तब्बल १५ लाख रुपयांचे दायित्व राहिले आहे. २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षाचा खर्च प्राथमिक शिक्षण विभागाने न केल्याने सभागृहात तीव्र नाराजी…

Read Full News

जि.प. आरोग्य विभागाच्या १.४८ कोटींच्या सुधारित अंदाजपत्रकास समितीची मंजुरी…

⚡सिंधुदुर्गनगरी ता २३-:जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत स्व उत्पन्नाच्या सन २०२६-२७ चे सुधारित १कोटी ४८ लाख ८४ हजार ६०० रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आजच्या सभेत वित्त समितीच्या मान्यतेसाठी शिफारस करण्यास मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा…

Read Full News

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान..

⚡सिंधुदुर्गनगरी ता २३-:संस्थात्मक प्रसूती उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य संस्थांचा आरोग्य समितीच्या सभेत सन्मान करण्यात आला, तर दुर्धर आजारग्रस्तांना आर्थिक मदत योजनेतील नव्या अटींचा प्रस्ताव सदस्यांनी फेटाळून लावत जुने निकष कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती…

Read Full News

पूरग्रस्त बांद्यासाठी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करा; ग्रामस्थांची जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडे मागणी…

⚡बांदा ता.२३-: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काळ व प्रभावी मदत मिळावी, यासाठी प्रशासन सज्ज झाले असून नुकतीच जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक घेतली होती. या पार्श्वभूमीवर आज बांदा ग्रामस्थांनी प्रमोद कामत यांची भेट घेऊन पूरनियंत्रणासंदर्भात विविध मागण्या मांडल्या.बांदा शहर…

Read Full News

केणीवाडा महोत्सव २०२६ चे अँड. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन…!

⚡बादां ता.२३-:केणीवाडा, पाडलोस येथे उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ‘केणीवाडा महोत्सव २०२६’ चे उद्घाटन ॲड. कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या महोत्सवाच्या निमित्ताने परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.या कार्यक्रमाला राजन पटेकर, अमिषा पटेकर, महेश कुबल, रत्नप्रभा कुबल, नंदू परब, अविनाश माफणकर, अदिती माफणकर, समीर नाईक, रोहन धुरी, गिरीश नाईक, अवधूत राणे,…

Read Full News

महामार्ग अपूर्ण तरीही टोलधाडी साठी सरकार तत्पर…

मनसेचे कुणाल किनळेकर यांचा आरोप.. ⚡कुडाळ ता.२३- : खासदार नारायण राणे यांच्या जन्मदिवसानिमित्त आलेले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फसव्या आश्वासनासह सिंधुदुर्ग जिल्ह्याला टोल भेट दिली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम वीस वर्षे झाली तरी अद्याप अपूर्णच आहे, मात्र सरकार टोलच्या धाडीसाठी तत्पर असल्याचा आरोप मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला…

Read Full News

You cannot copy content of this page