वेंगुर्ला
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला यांची मासिक सभा शनिवार दि. ४ जुलै रोजी सायंकाळी स्वामी प्रसाद बिल्डिंग, हॉस्पिटल नाका, वेंगुर्ला येथील मंडळाच्या कार्यालयात मंडळाचे अध्यक्ष ॲड. डॉ. आनंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेमध्ये भंडारी समाजातील निवडून आलेल्या सभासदांचा सत्कार करण्याचे निश्चित करण्यात आले. भंडारी समाजातील दहावी व बारावी परीक्षेत विविध शाळांमधून प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच पाचवी व आठवी तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात येणार आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील एलएलबी, एलएलएम, अभियांत्रिकी, वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींचा सन्मान करण्यात येणार असून सदर कार्यक्रम शनिवार, दि. १८ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता साई दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष ॲड. डॉ. आनंद बांदेकर यांनी दिली. यावेळी ॲड. शाम गोडकर, गजानन गोलतकर, सुरेश बोवलेकर, आनंद केरकर, दिपक कोचरेकर, जयराम वायंगणकर, आत्माराम उर्फ दादा सोकटे, भरत आवळे, गुरुनाथ कांबळी, श्रेया मयेकर, श्रेया मांजरेकर आदी सभासद उपस्थित होते. मंडळाचे सचिव प्रा. डॉ. जी. पी. धुरी यांनी आभार मानले.
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लातर्फे १८ जुलै रोजी विशेष सत्कार कार्यक्रम
