Headlines

शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, आचरा हायस्कूलचे उज्वल यश…

⚡मालवण ता.०४-;
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) मध्ये न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून प्रशालेच्या नावलौकिक वाढविले आहे.

ग्रामीण सर्वसाधारण गटामध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेचे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले असून कु. गौरी रत्नाकर उदगिरे मालवण तालुक्यात पहिली ), कु. नुर्वी गिरीश शेटगे (मालवण तालुक्यात सातवी ), कु. कौशल माधवराव भोसले (मालवण तालुक्यात सोळावा ) आणि कु. लक्ष गोपाळ वाडेकर (मालवण तालुक्यात विसावा ) यांनी यश संपादन केले तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत कु. वैष्णवी शंकर पेडणेकर आणि कु. स्वरा नित्यानंद तळवडकर शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अंकुश घुटुकडे, उपमुख्याध्यापिका सौ.मधुरा माणगांवकर , राजम, साटेलकर , सौ. फर्नांडिस, शेलार, राठोड या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page