Headlines

गुळदुवे येथे २५ रोजी “पृथ्वीकंकण” दशावतारी नाटकाचे आयोजन…

⚡वेंगुर्ले ता.२३-: श्री देव विरेश्वर सातेरी कला क्रीडा मंडळ गुळदुवे आयोजित,शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी रात्रौ ९:३० वाजतालोकराजा कै.श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत,श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर (कुडाळ) यांचा ट्रिकसीनयुक्त ,”एकपदा” अर्थात पृथ्वीकंकण हा नाट्यप्रयोग होणार आहे.या नाट्य प्रयोगाला नाट्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव विरेश्वर सातेरी कला क्रीडा मंडळ गुळदुवे व ग्रामस्थांनी केले…

Read Full News

विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे विद्यार्थ्यांप्रति कार्य प्रेरणादायी…

दादा साईल :विद्यार्थी सेवा प्रतिष्ठानचा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात.. ⚡कुडाळ ता.२३-: विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा (इयत्ता ५वी) २०२५-२६ अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयात विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष श्री. कर्पुरगौर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन…

Read Full News

स्मार्ट मीटर नेटवर्कअभावी ‘शून्य रीडिंग’वर ८० हजारांचे बिल…

उपसभापती गौरव मुळीक यांनी सभेत धक्कादायक प्रकार आणला समोर: रिक्त पदे, आरोग्य, रस्ते व अपघात प्रश्नांवरही सदस्य आक्रमक.. ⚡सावंतवाडी ता.२३-: स्मार्ट मीटरच्या नेटवर्क अभावी शून्य रीडिंग पडलेल्या तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या नळ योजनेचे बिल विज वितरणकडून तब्बल ८० हजार रुपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी आज सभागृहासमोर आणला. माझे फिल्ड सुद्धा…

Read Full News

मळगाव रेडकरवाडी येथे २५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

​​सावंतवाडी | प्रतिनिधी :मळगाव-रेडकरवाडी येथील स्थानदैवत श्री देव इशवटी येथे दरवर्षीप्रमाणे शनिवार, दिनांक २५ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, रात्री उशिरा दशावतारी नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.​यात ​दुपारी २ वाजता या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे गोवा म्हापसा येथील प्रसिद्ध…

Read Full News

रेडी येथे २४ रोजी जिल्हास्तरीय भजन…

⚡वेंगुर्ल ता.२३-: श्री सत्यपुरुष कला क्रीडा मंडळ,रेडी हुडावाडी आयोजित शुक्रवार दिनांक २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता श्री देव सत्यपुरुष रंगमंच रेडी हुडावाडी येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये ११,१११/- भगवान (छोटू) राणे पुरस्कृत तर चषक – रामसिंग राणे (सरपंच रेडी) यांचेकडून,व्दितीय पारितोषिक,८,८८८/- सागर जयसिंग राणे पुरस्कृत तर चषक…

Read Full News

तिरोडा श्री खाजणादेवी देवस्थान येथे १ मे रोजी धार्मिक कार्यक्रम…

⚡सावंतवाडी ता.२३-: तिरोडा (बामणवाडी) श्री देवी खाजणादेवी देवस्थान येथेशुक्रवार दिनांक १ मे रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.सकाळी ९ वाजता”श्रीं “वर महाअभिषेक व शाश्वत पूजादुपारी १:३०वाजता महाआरती व महागाऱ्हाणे,दुपारी २ वाजता महाप्रसाद तसेच रात्रौ ७ वाजताआरोलकर दशावतार नाट्यमंडळ आरवली (वेंगुर्ला – सिंधुदुर्ग) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.तरी सर्व भाविकांनी व भक्तगणांनी या कार्यक्रमाचा अवश्य…

Read Full News

मसुरे येथील स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन…

⚡मालवण ता.२३-:मसुरे मर्डेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त २६ व २७ एप्रिल रोजी सग्रह श्री स्वामी समर्थ सिद्धयाग आणि नवचंडी यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. दि. २६ रोजी सकाळी ८ पासून विविध धार्मिक कार्यक्रम, आरती, प्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. श्री स्वामी समर्थ पालखीनगर प्रदक्षिणा, ७ वा….

Read Full News

मालवण येथे ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत…

⚡मालवण ता.२३-:महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा समिती यांच्या निर्देशानुसार दिवाणी न्यायालय (क.स्तर), मालवण येथे दि. ९ मे रोजी सकाळी १० वा. ‘राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे. तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत पार पडणार आहे. दिवाणी न्यायालयात प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच…

Read Full News

कोळंब येथे २५ रोजी आरोग्य तपासणी व एक्स-रे शिबीर…

⚡मालवण ता.२३-:कोळंब येथे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या संकल्पनेतून उपकेंद्र कोळंब यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी व एक्स-रे शिबिराचे. आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर रविवार २५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत समर्थ मंगल कार्यालय, कोळंब येथे होणार आहे. या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, एक्स-रे सेवा तसेच डॉक्टरांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात…

Read Full News

मालवण शहरात दिवसाआड पाणीपुरवठा…

⚡मालवण ता.२३-:मालवण नगरपालिकेतर्फे २४ एप्रिलपासून शहरातील नागरिकांना नळयोजनेचा पाणीपुरवठा दिवसाआड करण्यात येणार आहे. सर्व नळधारकांनी याची नोंद घेऊन पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा तसेच पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. मालवण नगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेमार्फत शहर व शहराबाहेरील भागात दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, सध्या धामापूर तलावातील पाण्याची पातळी…

Read Full News

You cannot copy content of this page