Headlines

मालवण बाजारपेठेतून चोरी झालेली दुचाकी कुंभारमाठ येथे सापडली

मालवण (प्रतिनिधी)

मालवण बाजारपेठेतील बँक ऑफ इंडिया समोर उभी करून ठेवलेली ऍक्टिव्हा दुचाकी अज्ञात व्यक्ती घेऊन पसार झाल्याची घटनेनंतर ग्लोबल महाराष्ट्र या चॅनेलसह अन्य सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्तामुळे तसेच मालवण पोलिसांनी केलेल्या वेगवान तपासामुळे सदर दुचाकी कुंभारमाठ येथे सापडून आली. तसेच दुचाकी नेणाऱ्या त्या व्यक्तीलाही पोलीसांनी ताब्यात घेतले होते.

आज सकाळी मालवण मधील मिनू देऊलवर व त्यांचे वडील रवींद्र देऊलकर हे ऍक्टिव्हा (MH -15 – 9940) या दुचाकीने बँक ऑफ इंडिया मध्ये कामानिमित्त आले असता त्यांनी दुचाकी बँकेसमोर रस्त्याकडेला उभी करून ठेवली होती. बँकेतील काम आटोपून ते बाहेर आले असता दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे बँकेच्या सिसिटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता सदर ऍक्टिव्हा दुचाकी एका अज्ञात व्यक्तीने नेल्याचे दिसून आले. गाडी चोरी झाल्याबाबतचे तातडीने ग्लोबल महाराष्ट्र या चॅनेलसह अन्य सोशल मीडियावर वृत्त व्हायरल झाले होते तसेच मालवण पोलीसांना याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी जलद तपास केला. या तपासात पोलिसांना ही दुचाकी कुंभारमाठ येथे सापडून आली. यावेळी गाडी घेऊन जाणाऱ्या त्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गाडी सापडल्याने देऊलकर यांनी आपली तक्रारही मागे घेतली. तसेच गाडी शोधण्यासाठी मदत करणाऱ्या पोलीस, ग्लोबल महाराष्ट्र या चॅनेलसह अन्य सोशल मीडियाचे पत्रकार व नागरिकांचे देऊलकर यांनी आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page