मालवण दि प्रतिनिधी
आज जगामध्ये सेवाभाव महत्त्वाचा ठरतो आहे. पण अशा सेवाभावी मूल्यांची प्रशासनातील भूमिका महत्वाची असून अशी सेवाभावी व्यक्तिमत्वे प्रशासनातील खरे आधारस्तंभ असतात व ते मार्गदर्शक असतात. त्यांच्या बहुमोल सल्ल्यामुळे प्रशासन गतिमान होत असते. आज च्या युगात अशी सेवाभावी व्यक्तिमत्वे निर्माण होणे काळाची गरज आहे असे गौरव उद्गार वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक श्री जयवंत भाऊ पेडणेकर यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने काढले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून सौ व श्री जयवंत पेडणेकर यांचा कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने व प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे यांनी केले .यावेळी व्यासपीठावर संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन श्री.सुधीर वराडकर, खजिनदार श्री.रविंद्र पावसकर,संचालक महेश वाईरकर,सौ.स्वाती वराडकर , वराडकर इंग्लिश मिडीयम चे मुख्याध्यापक श्री.ऋषी नाईक, साळगाव माध्यमिक उच्चमाध्यमिक प्रशालेचे सहायक शिक्षक श्री.नार्वेकर सर, बागेवाडी सर,माजी मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत पंडित लिपिक श्री.सावंत आदी उपस्थित होते
यावेळी संस्थेचे सचिव सुनील नाईक, सहसचिव श्री एस डी गावडे, झाराप पंचक्रोशी साळगाव चे माजी अध्यक्ष श्री.प्रमोद रविंद्र धुरी तसेच शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे मुख्याध्यापक श्री ताकीलदार वराडकर कॉलेज कट्टा प्राचार्य श्री ध्वजेंद्र मिराशी, पर्यवेक्षक श्री महेश भाट, सुप्रिया नाईक,श्री एकनाथ राऊळ श्री विद्यानंद पिळणकर, श्री.सुनील पाटकरयांची समयोचित मनोगत झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी केले.
यावेळी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
