Headlines

मडूरा येथे भाजपा युवानेते विशाल परब यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दप्तर-वह्यांचे वाटप…

युवा नेतृत्व प्रवीण उर्फ पिंट्या परब यांच्या हस्ते शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण..

⚡बांदा, ता. ५ -: भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून मडूरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच गावातील विविध अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना दप्तर व वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली.
या कार्यक्रमात मडूरा गावाचे युवा नेतृत्व तथा भाजपा कार्यकर्ते प्रवीण उर्फ पिंट्या परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर व वह्यांचे वितरण करण्यात आले. प्रवीण परब हे सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असून पक्षाच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवत असतात. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रत्येक विद्यार्थ्याला दप्तर मिळावे, या उद्देशाने भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ चे शिक्षक श्री. बरागडे, शाळा क्रमांक २ च्या शिक्षिका सौ. सुषमा पोपकर, शाळा क्रमांक ३ च्या शिक्षिका सौ. कोलते, परबवाडी बालवाडीच्या श्रीमती उज्वला परब, देऊळवाडी बालवाडीच्या पल्लवी परब, बाबरवाडी बालवाडीच्या श्रीमती पल्लवी गवंडी तसेच संबंधित शाळा व अंगणवाड्यांतील विद्यार्थी उपस्थित होते.
याशिवाय स्थानिक प्रतिनिधी श्रीराम जाधव, अथर्व जाधव, पंकज जाधव, निलेश जाधव, श्रुती जाधव आणि आंतोन डिसोजा आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.

You cannot copy content of this page