Headlines

टीकेकडे दुर्लक्ष करा…

राज्य सरकार नगराध्यक्षांच्या पाठीशी खंबीर; नाव न घेता पालकमंत्री नितेश राणे यांचा संजू परब यांच्यासह विरोधकांना टोला..

सावंतवाडी, ता. ५-: समाजात एखाद्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याऐवजी केवळ टीका करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. मात्र, टीकेकडे अजिबात लक्ष देऊ नका, असा सल्ला पालकमंत्री नितेश राणे यांनी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांना दिला. यावेळी त्यांनी नाव न घेता संजू परब यांच्या विरोधकांवरही टोला लगावला.


राणे म्हणाले, “उद्योगपती धीरुभाई अंबानी यांनी म्हटले आहे की, ‘तुम्ही यशस्वी होत आहात हे कशावरून समजायचे? जेव्हा तुमच्यावर सर्वाधिक टीका होते.’ त्यामुळे टीका ही यशाची पावती समजून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे.”


ते पुढे म्हणाले, “वाकड्या आणि आव्हानात्मक रस्त्यावर वाहन चालविण्यातच खरी मजा असते. त्याचप्रमाणे आव्हानांना सामोरे जात काम करणाऱ्यांनाच यश मिळते. नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी क्रीडा क्षेत्रात पुढाकार घेऊन उल्लेखनीय काम केले आहे. पालकमंत्री म्हणून मी आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”

You cannot copy content of this page