आंबोलीत सुप्रिया गावडे व मायकल डिसोझा यांच्या प्रचारात मोठी मुसंडी…

⚡सावंतवाडी, ता.३१-:
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून जिल्हा परिषद उमेदवार सौ. सुप्रिया दिनेश गावडे व पंचायत समिती उमेदवार मायकल डिसोझा यांच्या प्रचारात मोठी मुसंडी दिसून येत आहे. आंबोली परिसरात डोअर-टू-डोअर प्रचार, कार्यकर्ता मेळावे तसेच महिला मेळाव्यांच्या माध्यमातून उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला.

यावेळी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शिवसेनेच्या विकासात्मक कामांवर मतदारांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

या प्रचार दौऱ्यात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व युवासेना मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे,” असे मत उमेदवारांनी यावेळी व्यक्त केले.

आंबोली मतदारसंघात शिवसेनेचा विजयाचा संकल्प अधिक मजबूत होत असून येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा कौल आपल्या बाजूने येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page