महेश सारंग यांच्या विजयासाठी कोलगाव जि.प. मतदारसंघात मंगेश तळवणेकरांचा घरोघरी जोरदार प्रचार…

⚡सावंतवाडी ता.३१-:
माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात घरोघरी प्रचार करताना मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश सारंग तसेच पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार सौ. प्राजक्ता केळुसकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रचारादरम्यान मतदारांकडून, “तू आमच्या घरातलोच आसय, तेव्हा दोनय उमेदवारांका आम्ही निवडून आणतलव,” अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

कमळ निशाणीवरच मतदान करणार, असा ठाम विश्वास अनेक मतदारांनी व्यक्त केला.
या प्रचारात ज्येष्ठ, जाणते मतदार तसेच युवा वर्गाचा मोठा सहभाग पाहायला मिळत असून सर्व स्तरांतून महायुती उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, कारीवडे गावात घरोघरी प्रचार करत असताना मंगेश तळवणेकर यांचा निवांत क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला असून तो मतदारांशी असलेले त्यांचे आपुलकीचे नाते अधोरेखित करतो.

You cannot copy content of this page