Headlines

अपप्रवृत्ती व हुकूमशाही विरोधात आमची लढाई…

मायकल डिसोजा यांचा हल्लाबोल: प्रचार कार्यालयाच केल उत्साहात उद्घाटन..

⚡सावंतवाडी ता.०१-:
कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या दांडगी हुकूमशाही सुरू असून तिची तीव्रता सामान्य नागरिकांच्या कल्पनेपलीकडची आहे, असा आरोप मायकल डिसोजा यांनी केला. येणाऱ्या निवडणुकीत जनता या हुकूमशाहीला निश्चितच धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

आज जिल्हा बँकेचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर करून घेतला जात असल्याचा गंभीर आरोप करत, ही हुकूमशाही नेमकी कुठून येते? याकडे वरिष्ठ नेत्यांचे लक्ष नाही का? असा सवालही डिसोजा यांनी उपस्थित केला. अन्यथा याची किंमत जिल्हा बँकेलाही मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या सत्ताधाऱ्यांना आलेल्या सत्तेच्या ब्रह्माचा भोपळा येत्या ९ तारखेला निश्चितच फुटेल आणि जिल्हा परिषदवर जाण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहील, असा हल्लाबोल त्यांनी केला. आज सर्वच पदे एका घरात एकवटली असून अजून किती पद हवी आहेत..? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.कोलगाव मतदारसंघातील जनता या हुकूमशाहीला पूर्णपणे कंटाळलेली असून त्याचे उत्तर ९ तारखेला मतदानातून देईल, असा विश्वास मायकल डिसोजा यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रत्येक नागरिकाच्या घरोघरी जाऊन पत्रक वाटप करत आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

You cannot copy content of this page