Headlines

कालावल खाडीतील सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटी दरम्यानचा वाळू सदृश्य गाळ काढण्यासाठी लिलाव प्रक्रिया व्हावी…

रेवंडी ग्रामस्थांची आम. निलेश राणेंकडे मागणी.. ⚡मालवण ता.२४-: कालावल रेवंडी खाडीपात्रात सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटी दरम्यान साचलेला वाळू सदृश्य गाळ काढण्यासाठीची लिलाव प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी रेवंडी ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर याच मागणीबाबत रेवंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन सादर करत शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात उपोषणासारखे पाऊल उचलावे…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानाचा १४ मंडलाचा अहवाल प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सादर..

⚡वेंगुर्ला ता.२४-: भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरीत्या पार पडलेल्या निवासी मंडल प्रशिक्षण वर्गांचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची मुंबई – दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात भेट घेऊन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.यावेळी अभियानाचे…

Read Full News

शासनस्तर उपक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा वेंगुर्ला पंचायत समितीतर्फे सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२४-: प्लास्टिक व ई कचरा संकलन अभियान अंतर्गत जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांनी राबविलेल्या उपक्रमात वेंगुर्ला तालुकास्तरावर प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या दुर्वा विष्णू मडवळ( परुळे शाळा नं. 3), मंथन मंगेश करंगुटकर (मठ शाळा नं. 1) व जयेश बाबुराव गावडे (शाळा वरचे अणसूर )या विद्यार्थ्यांना उपक्रम मधील यशाबद्द्ल सभापती शंकर घारे व उपसभापती…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सावंतवाडी शहर येथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री करणार आहेत.

Read Full News

निरवडे येथे ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा पहिला टप्पा निरवडे येथे उत्साहात पार पडला. या शिबिराच्या माध्यमातून निरवडे मंडळातील आठ गावांमधील शेकडो लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांचे व योजनांच्या लाभाचे थेट वाटप करण्यात आले. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन आम. दीपक…

Read Full News

सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या सोहम चौधरीचे JEE परीक्षेत यश…

⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा इयत्ता १२ वीचा विद्यार्थी सोहम चौधरी याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (NTA) आयोजित ‘JEE मेन्स’ परीक्षेत ९२.५६ पर्सेंटाइल मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर सोहम आता ‘JEE ॲडव्हान्स’ परीक्षेसाठी पात्र ठरला असून, JEE Advance परीक्षा देऊन तो आयआयटी (IIT) सारख्या देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवू शकेल. सोहमच्या…

Read Full News

वादळात कोसळलेल्या वटवृक्षाला नवसंजीवनी; नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम..

कारिवडे प्रकल्पावर पुनर्लागवड; पर्यावरणप्रेमींकडून नगरपरिषदेच्या कार्याचे कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.२४-: शहरात झालेल्या वादळी वाऱ्याने जुन्या मुंबई- गोवा महामार्गालगत असलेल्या महापुरुष देवस्थान येथील रूजून आलेला वटवृक्ष कोसळला होता. यावेळी पहाणी दरम्यान प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी हे झाड न.प. च्या जागेत लावण्यासाठीच्या सुचना दिल्या होत्या. त्यांच्या सुचनेनुसार हा वटवृक्ष न.प.च्या कारिवडे येथील प्रकल्पावर लावण्यात आला आहे. येथे…

Read Full News

अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान; ‘घरपट्टी विमा’ योजनेची मागणी पुन्हा ऐरणीवर…

राजू मसुरकर यांचा पुनरुच्चार; २०० रुपयांत ५ लाखांपर्यंत संरक्षणाची सूचना, राजकीय उदासीनतेवर नाराजी.. ⚡सावंतवाडी ता.२४-: गेल्या २४ तासांत सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान’चे अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘घरपट्टी विमा’ योजनेच्या मागणीचा पुनरुच्चार करत राजकीय उदासीनतेबद्दल खंत व्यक्त…

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांप्रश्नी आढावा..

⚡सिंधुदुर्गनगरी, दि.२४-: सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील मंजूर व प्रस्तावित विकास कामांच्या प्रगतीचा सखोल आढावा घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विकास योजनांवर सविस्तर चर्चा होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी यांच्यासह…

Read Full News

उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार व माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट..

⚡सावंतवाडी ता.२४-: शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार व माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय घडामोडी तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध समस्या व पक्षाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत ठाकरे यांना माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी…

Read Full News

You cannot copy content of this page