Headlines

गळा दाबून खुनाच्या प्रयत्नातील संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता..

⚡सावंतवाडी, ता. ७-: तालुक्यातील कोनशी-टेंबवाडी येथील संशयित आरोपी बाबलो शंकर वरक याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गळा दाबून खुनाचा प्रयत्न प्रकरणात ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी हा निकाल दिला. आरोपीतर्फे अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश चव्हाण, अॅड. प्रितेश गावस, अॅड. दसप्रसाद ठाकूर, अॅड. केतन जाधव व अॅड. वामन गावस यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page