Headlines

कोयत्याच्या हल्ल्याच्या आरोपातून संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता..

⚡सावंतवाडी, ता. ७ -: कोयत्याने वार करून दुखापत केल्याचा तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने संशयित आरोपी सागर आबा साळुंखे याची सर्व पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. अनिल कृष्णा निरवडेकर, ॲड. गणेश चव्हाण, ॲड. दत्तप्रसाद ठाकूर, ॲड. केतन जाधव आणि ॲड. वामन गावस यांनी काम पाहिले.

या प्रकरणात २० जुलै २०२२ रोजी फिर्यादी आपल्या वाहनाची चार्जिंगसाठी दिलेली बॅटरी घेऊन घरी परतत असताना आरोपीने मागून येत कोयत्याने वार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या झटापटीत फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ दुखापत झाल्याचे तसेच आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत नोंदविण्यात आली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एकूण सात साक्षीदारांची तपासणी केली. मात्र, फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबांमध्ये महत्त्वपूर्ण विसंगती आढळून आल्याने आणि सरकारी पक्षाला आरोप शाबीत करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. अनिल कृष्णा निरवडेकर, ॲड. गणेश चव्हाण, ॲड. दत्तप्रसाद ठाकूर, ॲड. केतन जाधव आणि ॲड. वामन गावस यांनी काम पाहिले.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती जे. एम. मिश्री यांनी हा निकाल दिला.

You cannot copy content of this page