विशाल परब यांच्या पुढाकारातून बाजारपेठेत उपक्रम; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग..
⚡सावंतवाडी, ता.०७-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी भाजपा उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, सावंतवाडी मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात उपयोगी ठरणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.
यावेळी नगरसेवक सिद्धार्थ भांबूरे, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, दिलीप भालेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, निलम नाईक, सुनिता पेडणेकर, केतन आजगांवकर, सुदेश नेवगी, सुमित वाडकर, ॲड. संजू शिरोडकर, नागेश जगताप, धिरेंद्र म्हापसेकर, बंटी जामदार, संतोष तळवणेकर, अल्ताफ मुल्ला, कुणाल शुंगारे, मेघना साळगावकर, ज्योती मुदाळे, अवनी मेस्त्री तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
