Headlines

सांगेलीतील नुकसानग्रस्त विष्णू राऊळ यांच्या मदतीला धावले संजू परब…

⚡सावंतवाडी ता.०६-: सांगेली येथील विष्णू राऊळ यांच्या घरावर फणसाचे झाड पडून नुकसान झाल्याची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विष्णू राऊळ यांना आर्थिक मदत देत धीर दिला.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, बाबुराव कविटकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार, रमाकांत राऊळ तसेच दीपक सांगेलकर उपस्थित होते.

यावेळी संजू परब यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page