कणकवलीतील भाजपच्या तिरंगा रॅलीत संचारला उत्साह
वंदे मातरम, भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमला ⚡कणकवली ता.१४-: कणकवलीत भाजपाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार नितेश राणे स्वतः या रॅलीत सहभागी झाले. त्यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या रॅलीत सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन या रॅलीला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार…
