लम्पी स्कीन डिसीज प्रादुर्भाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही ;

मात्र खबरदारी म्हणून जनावरांचे लसीकरण सुरू; डॉ. आर बी दळवी

⚡मालवण ता.२१-: गाय, बैल आदी जनावरांमध्ये पसरणारा लम्पी स्किन डिजीज प्रादुर्भाव सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात नाही. तरीही खबरदारी म्हणून जनावरांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपलब्ध १० हजार डोस तालुकास्तरावर वितरित करण्यात आले आहेत. अधिक २५ हजार डोस शनिवार पर्यत उपलब्ध होतील. तर उर्वरित ७० हजार डोस नजीकच्या काळात उपलब्ध होतील त्यानुसार नियोजन करून जनावरांचे लसीकरण पूर्ण केले जाईल. मालवण तालुक्यालाही १ हजार डोस उपल्बध करण्यात आले आहेत. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर बी दळवी यांनी बुधवारी मालवण तहसीलदार कार्यालय येथे दिली.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज प्रादुर्भाव दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मालवण तहसीलदार तथा तालुका सनियंत्रण समिती अध्यक्ष अजय पाटणे यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर बी दळवी, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. वाय डी गोसावी, मालवण पशुधन विकास अधिकारी डॉ. टी एस वेर्लेकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर बी दळवी यांनी जनावरांच्या लम्पी स्किन डिजीज आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांचे बाजार, जनावरांची एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात होणारी वाहतूक यावर शासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. त्या अनुषंगाने चेकपोस्टवर दक्ष राहण्याची खबरदारी घ्यावी अशा आशयाचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्याचे सांगितले

म्हैस, बकऱ्या, कोंबड्या यांना आजार नाही त्यामुळे दूध मांस खाण्यास अपाय नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापपर्यंत तरी लंपी स्किन डिजीज नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र सतर्कता पाळावी. जर कुठे या आजाराची लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास नजीकच्या दवाखान्यात माहिती द्यावी. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त डॉ. आर बी दळवी यांनी केले आहे

You cannot copy content of this page