राजवाडा परिसरात ९ ऑक्टोबर रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

लाभ घेण्याचे युवराज लखमराजे व नकुल पार्सेकर यांचे आवाहन

सावंतवाडी : सावंतवाडी संस्थान व अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व सांगली येथील उषःकाल अभिनव इन्सिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स या अद्ययावत हॉस्पिटलच्या सहकार्यानं रविवारी ९ ऑक्टोबर रोजी महाआरोग्य शिबिराच आयोजन करण्यात आले आहे. राजवाडा परिसरात हे महा आरोग्य शिबीर होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबीराचे निमंत्रक तथा सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. नकुल पार्सेकर यांनी केल आहे.

रविवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.३० ते १२.३० या वेळेत राजवाडा परिसरात हे महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू तर प्रमुख अतिथी प्रसार भारतीचे पश्चिम भारताचे अतिरिक्त निर्देशक निरज अग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात हदयरोग तज्ञ, अस्तिरोग शल्यचिकित्सक,
स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, जनरल सर्जन,पेन मॅनेजमेंट तज्ञ उपस्थित राहणार असून रूग्ण तपासणी केली जाणार आहे. तर निशुल्क इसीजी आणि २D+ECO देखील केल जाणार असून मोफत औषधे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. अमेय देसाई काम पाहत आहेत या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, अटल प्रतिष्ठानचे अँड. नकुल पार्सेकर यांनी केल आहे. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. नकुल पार्सेकर, डॉ. राजशेखर कार्लेकर,डॉ. सतिश सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page