जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी वेधले लक्ष
सिंधुदुर्गनागरी ता २१
राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करत जिल्हाधिकारी याना मागण्यांचे निवेदन सादर केले.
सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आज २१ सप्टेंबर रोजी ११ वाजता जिजामाता चौक ते ओरोस फाटा शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदर्गनगरी या मार्गावर कर्मचारी यांची बाईक रॅली आयोजीत केली होती . मात्र जिल्ह्यात मनाई आदेश असल्याने या रॅलीला पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकरली. त्यामुळे आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यानी जिल्हाधिकारी कार्यालया समोर घोषणा देत निदर्शने केली .तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्याकडे सादर केले. या निवेदनातून
नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करावी.,
शासकीय नोक-यांतील कंत्राटी भरती बंद करुन कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना शासकीय सेवेत सामावुन घ्यावे,
सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत मा.बक्षी समीतीच्या खंड -२ मधील शिफारशी तात्काळ लागु करणे,
या प्रमुख मागण्या सह विविध १८ मागण्या कड़े शासनाचे लक्ष वेधले आहेत.
यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना कार्याध्यक्ष सत्यवान माळवे, महसूल कर्मचारी संघटनेचे
राजन वालावलकर, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस
एस एल सपकाळ, संजय पवार,
सुनील खांदारे,
राजेश चव्हाण,
श्रीराम चव्हाण,
सचिन मदने, संदीप गवस , अजय शिंदे, के टी चव्हाण, विनय मयेकर, प्रवीण पाताडे,यांच्यासह ग्रामसेवक संघटना सिंधुदुर्ग
व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख सभा , महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन महाराष्ट्र, राज्य वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन, इत्यादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
