मालवण शहरात मतदान – आधार ओळखपत्र जोडणी कार्यक्रम

⚡मालवण ता.२१-: निवडणूक आयोग यांच्या सुचनेनुसार मतदार यादीतील तपशिलाशी आधारलिंक जोडणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असून त्या अनुषंगाने मालवण तालुक्यातील मतदार यादीतील सर्व मतदारांचे आधारलिंक चे काम संबंधित त्या गावाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत सुरू करण्यात आले आहे. स्वत: मतदार देखील Voter Help line या अॅप द्वारे आधार जोडणी करत आहेत. मालवण नगरपालिका हद्दीतील मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्राशी मतदारांचे आधार जोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे, नागरिकांनी मतदान केंद्रांवर जाऊन मतदान ओळखपत्र आधारकार्डाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

मालवण नगरपालिका हद्दीतील मतदारांनी त्यांचे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, व मोबाईल नंबर घेऊन नियुक्त केलेल्या मतदान केंद्र क्रमांक- ९३- श्री. व्ही. बी. रावले लिपिक नगरपालिका मालवण, ९४- श्री. मंदार केळुसकर लिपिक न. प. मालवण, ९५ – श्री. शिवराज सावंत सहा. शिक्षक जि.प.शाळा दांडी मालवण, ९६ – श्री. भुपेश गोसावी उपशिक्षक भंडारी प्राथमिक शाळा, ९७- श्री.टी.व्हि. वळवी कनिष्ठ सहा. पंचायत समिती मालवण, ९८- श्री. ल. के. परब लिपिक न. प. मालवण, ९९ – श्री.व्हि. सी. वाघमोडे कनिष्ठ सहा. आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय मालवण, १०० श्री. प्रथमेश कोचरेकर शिपाई जि.प. बांधकाम उपविभाग मालवण, १०१ – श्री. आर. एस. परब लिपिक भूमी अभिलेख मालवण, १०२- श्री. आनंद शेलटकर कनिष्ठ सहा.पं. स. मालवण, १०३ – श्री. ओंकार जनार्दन चव्हाण कनिष्ठ सहा. पं. स. मालवण, १०४- श्री. आर. के. कांबळी कोतवाल तहसिलदार कार्यालय मालवण, १०५- श्रीम. नम्रता शदर भगत अंगणवाडी सेविका वायरी भूतनाथ जाधववाडी, १०६- श्रीम. राधिका मोरजकर अंगणवाडी सेविका दांडी शाळा १०७- श्री.व्हि. एन. पास्ते तलाठी मालवण, १०८- श्रीम. अनुराधा रमेश पाटकर अंगणवाडी सेविका अंबाजी विद्यालय वायरी मालवण या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सकाळी १० ते ६ यावेळेत जाऊन आपला व आपल्या घरातील मतदाराचा आधार नंबर मतदार ओळखपत्रासोबत लिंक करून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page