रामदास कदम यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या त्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल…

⚡दोडामार्ग ता.२२-: ठाकरे कुटुंब व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल वक्तव्ये करणाऱ्या माजी मंत्री रामदास कदम यांच्या विरोधात काल शिवसेना (उद्धव ठाकरे) दोडामार्गच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करताना त्यांच्या बेनरला चप्पल काढून मारले तसेच घोषणाबाजी केली यामुळे मा. जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या मनाई आदेशाचा भंग झाला असा ठपका ठेवून त्या पदाधिकाऱ्यां विरोधात दोडामार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

यात संजय गवस, मदन राणे, श्रेयाली गवस,विनिता घाडी,मिलिंद नाईक, संतोष मोरये, लीना कुबल, संदेश राणे, संदेश गवस, ओंकार कुलकर्णी, शुभम धर्णे वैगरे विरुध्द गुन्हा दाखल केल्याची माहिती दोडामार्ग पोलीस स्थानकातून देण्यात आली अधिक तपास पो.नि आर.बी.अधिकारी
दोडामार्ग पोलीस ठाणे हे करत आहेत.

You cannot copy content of this page