अरुण पडवळ यांना मातृशोक…

⚡सावंतवाडी ता.२२-: शहरातील सर्वोदय नगर येथील रहिवासी तारामती सीताराम पडवळ ( वय ७५) यांचे आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, 3 सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शहरातील व्यवसायिक अरुण पडवळ यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page