शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ
ओरोस ता.२२-: जुनी पेन्शन व शिक्षकांच्या अन्य न्याय्य मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या राष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीमेचा सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये शुभारंभ करण्यात आला आहे.सन २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.,शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित शिक्षकांची नेमणूक करा., नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक विरोधी तरतुदी काढून टाका., सातव्या वेतन आयोगाच्या…
