शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची पोलीस अधीक्षकांजवळ मागणी
⚡सावंतवाडी ता.२९-: युवकांच्या भविष्यासाठी सावंतवाडी तालक्यातील अवैध धंद्यांना आळा घाला, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी पोलीस अधीक्षकांजवळ केली.
सावंतवाडी तालुक्यामध्ये महाराष्ट्राच्या हद्दीवर्ती पोलीस चेक पोस्ट इन्सुली खामदेव नाका , सातार्डा, आरोंदा व आंबोली येथे आहेत . सदर चेक पोस्ट वर गाडी तपासणी केला जाते. परंतु सदर चेक पोस्ट मार्गे जिल्ह्यात प्रवेश केलेल्या गाड्यांवर दारूचे बॉक्स सापडतात. तसेच मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पडलेल्या मटक्याच्या चिठ्ठ्या दिसतात ,तसेच रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे चालू असल्याची चर्चा तालुक्यात जोरदार आहे .अशा प्रकारे अवैध धंद्यांना उत आल्यामुळे सावंतवाडी तालुक्यात मारामारी, चोरी, युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण ,लैंगिक अत्याचार अशा आरोपांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे .
परंतु प्रामुख्याने सदर आरोपींमध्ये तरुण युवकांची मोठी संख्या आहे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील तरुणाई अवैद्य धंद्यांना मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्याचे बोलले जात आहे. सावंतवाडी तालुक्यातील तरुण युवकांचे भविष्य योग्य दिशेने घडविण्यासाठी आपण तालुक्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करून सुरू आलेल्या अवैध धंद्यांना आळा घालावा,
तसेच गोवा राज्य सिमेवर असल्याने अमंली प्रदार्थ, गोवा बनावट दारूची वाहतूक, विक्री होते त्यामुळे तपासणी नाकी बळकट करून कारवाईचा बडगा उगारला जावा, अशी मागणी केली
