मोती तलावातील मासे पकडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

माजी नगरसेवक राजू बेग यांनी नगरपरिषदे जवळ केली होती मागणी

सावंतवाडी ता.२९-:शहरातील परप्रांतीय कामगार रात्रीच्या वेळी मोती तलावातील मासे पकडतात. त्यावर बंदी घालण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी माजी नगरसेवक राजू बेग यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. याची तत्काळ दखल नगरपालिकेने घेतली असून, मासेमारी करताना आढळून आल्यास कारवाई केली जाईल. असे फलक नगरपालिकेकडून मोती तलावाच्या काठावर लावण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page