भाजपच्या महारक्तदान शिबिर केंद्रीयमंत्री राणे राहणार उपस्थित

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवड्या अंतर्गत उपक्रम

वैभववाडी प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त वैभववाडी भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. तसेच तालुक्यात शुक्रवार दि. ३० सप्टेंबर रोजी महारक्तदान शिबीराचे ग्रामीण रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी दिली आहे.
वैभववाडी भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याकरिता भाजपा युवामोर्चा, महीला आघाडी व बेसीकच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली.
या शिबिराला केंद्रीय मंत्री नारायण राणे, आ.नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातून ३५० रक्तदात्यांची आतापर्यंत नोंदणी झाली आहे. भाजपाचा ४००हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान करण्याचा संकल्प आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशी माहीती नासीर काझी यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन श्री काझी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page