रक्षाबंधनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या..
⚡सावंतवाडी, ता. २८ -: सावंतवाडी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांचे सावंतवाडी शहर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच रक्षाबंधनाच्या सणानिमित्त पोलीस निरीक्षक मगदूम यांच्यासह पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महिला पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी पोलीस आणि समाज यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला नागरिकांकडून सहकार्य मिळावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला शहरप्रमुख भारती मोरे, नगरसेविका सायली दुभाषी, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, कीर्ती बोंद्रे, दिपाली सावंत, सायली होडावडेकर, लतिका सिंग, प्रतिमा नाटेकर, मनाली राऊत, सत्वशिला कुपवडेकर, अमिता सारंग, मनीषा परब, आरती खोरागडे, मिलाग्रीन डॅन्टस, साजिदा रेडकर, पूजा धोत्रे, तृप्ती मालवणकर आदी शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
