Headlines

उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे यांच्यामार्फत मोचेमाड येथे शैक्षणिक साहित्य वाटप

वेंगुर्ला
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मोचेमाड येथे सन 2025-26 या वर्षातील शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध विषयात नैपुण्य मिळवले, त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जि. प. सदस्य संजय गावडे यांनी विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्याच बरोबर मराठी शाळांमध्ये विध्यार्थ्यांना ओढ निर्माण होऊन मराठी शाळा टिकण्यासाठी सात्यत्याने प्रयत्न करणार असे प्रतिपादन करुन मुलांनी मोबाईलचा वापर कमी करुन वाचनात ओढ निर्माण केली पाहिजे, तरच आपल्या ज्ञानात भर पडेल, असे आवाहन केले.यावेळी आसोली पं. स. सदस्य संकेत धुरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद नाबर, उपाध्यक्ष जान्हवी मोचेमडकर तसेच इतर सर्व सदस्य व शिक्षणप्रेमी विलास चोपडेकर, कृष्णा कुबल,
नारायण वरगावकर,
संतोष चोपडेकर, श्री.
चंद्रकांत पालव,
अमोल मोचेमाडकर,
कान्होबा गावडे, विठ्ठल वरगावकर, ग्रामपंचायत अधिकारी स्वप्नील जाधव, मुख्याध्यापक महेंद्र खोमणे, पदवीधर शिक्षक राम जाधव , उपशिक्षिका मंजुश्री धांडे
आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page