गोवा सरकारने महाराष्ट्रातील खनिज वाहतुकीवर सुरू केली आहे रॉयल्टी
बांदा
महाराष्ट्रातून गोव्यात होणार्या खनिज वाहतुकीवर पाचशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत रॉयल्टी आकारण्याची प्रक्रिया गोवा सरकारकडून शुक्रवार 23 पासून सुरु केली. या निर्णयाचा महाराष्ट्र मधून गोव्यात वाहतूक करणाऱ्या डंपर व्यावसायिकांना फटका बसला आहे. याबाबत गोवा येथील डंपर व्यावसायिकांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट घेतली मात्र भेटीनंतर सुद्धा कोणता ठोस निर्णय झाला नसल्याने आता लवकरच सिंधुदुर्ग डंपर व्यावसायिक महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत्या चार दिवसात भेट घेणार आहेत तसा निर्णय त्यांनी सायंकाळी बांदा येथे आयोजित बैठकीत घेतला.
गोवा राज्य शासनामार्फत गोव्यात येणाऱ्या खनिज वाहतूकीवर रॉयल्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा चाकी वाहनांवर पाचशे रुपये व दहा चाकी वाहनांवर एक हजार रुपये रॉयल्टी आकारण्यास सुरुवात केली. या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
या पाश्र्वभूमीवर गोवा आणि सिंधुदुर्ग मधील व्यावसायिकांनी संयुक्त बैठक बांदा येथे शनिवारी 24 रोजी घेतली यात जोपर्यंत यावर कोणता ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत ट्रान्सपोर्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर त्या पश्वभूमीवर गोवा मुख्यमंत्री डॉ सावंत यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार आज गुरुवारी डॉ सावंत यांची गोवा येथील डंपर व्यावसायिकांनी भेट घेतली. मात्र या भेटीत सकारात्मक निर्णय झाला नाही.
त्यानुसार गोवा व सिंधुदुर्ग मधील डंपर व्यावसायिकांनी बांदा येथे परत बैठक घेत वाहतूक बंद ठेवण्यात येईल असा ठाम निर्णय घेत याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत्या चार दिवसांत भेट घेऊन त्यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती करूया असे ठरविण्यात आले. यावेळी डंपर संघटनेचे शाम धुरी, प्रशांत पांगम, अभि नाईक, उत्कर्ष तेली, मिलिंद शेट्ये, सुशांत एकावडे, मंदार तेली, तेजस सावंत आदि उपस्थित होते.
