Headlines

शिवसेना महिला आघाडीतर्फे आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२८-: शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात उत्साहात पार पडला.

यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत यांच्यासह नगरसेविका शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, स्नेहा नाईक, सुप्रिता धारणकर, भारती परब, शिवानी पाटकर, संध्या पाटणकर, पूजा नाईक, राजश्री निर्गुण, नीलम कुमठेकर, अर्चना ब्रोद्रे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, संतय गांधी अध्यक्ष गजानन नाटेकर, विभागप्रमुख श्री. वरक, शैलेश मेस्त्री, सोनुर्लेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना राखी बांधून बंधुभावाचा संदेश दिला. कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page