कलमठचे सुपुत्र ॲड.केयुर काकतकर यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड
⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यातील कलमठ गावचे सुपुत्र ॲड. केयुर दिनेश काकतकर यांची दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली आहे. सतत 7 वर्षे अथक परिश्रमानंतर अखेर ॲड. केयुर काकतकर यांनी आपले ध्येय साध्य करत न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. ॲड.केयुर काकतकर यांनी एमपीएससी 2021 च्या परीक्षेत हे सुयश…
