अन्य सहकाऱ्यांचाही केला सन्मान
⚡सावंतवाडी ता.१३-:
येथील वकील संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक व सहकारी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
ॲड.नाईक हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्षपदी निवडून आल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज सावंतवाडी वकील संघटनेने त्याचा सत्कार केला.यावेळी ज्येष्ठ वकील अँड सुभाष पणदूरकर व अँड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते अध्यक्ष अँड. परिमल नाईक यांचा तर खजिनदार अँड. अण्णा बांदेकर यांचा अँड. शाम गोडकर यांच्या हस्ते तर उपाध्यक्ष (महिला ) अँड. निलिमा गावडे यांचा अँड. सुभाष पणदूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अँड. श्रीकृष्ण ओगले, अँड. गणेश पारकर, अँड.भुवन कुबल तसेच सावंतवाडी वकील संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अँड. संदीप निंबाळकर, अँड. शाम सावंत, अँड. अमोल कविटकर, अँड. रामनाथ बावकर, अँड. श्रीनिवास गवस, अँड. पि. डी. देसाई, अँड. अजित राणे, अँड. सौ. नीता कविटकर, अँड. शेटकर, अँड. रणशूर, अँड. प्रकाश परब, अँड. राघवेंद्र नार्वेकर यांच्या सह महिला व पुरुष वकील वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
या वेळी अँड. गोडकर, अँड. शाम सावंत, अँड. नीता सावंत, अँड. संदीप निंबाळकर, अँड. अमोल कविटकर, अँड.दिलीप नार्वेकर, अँड. सुभाष पण दूरकर यांनी सत्कार पर मनोगत व्यक्त केले.
वकिली व्यवसायचा दर्जा व मान सन्मान उंचावण्यासाठी तसेच नवोदित वकिलांच्या सक्षम भवितव्यासाठी आणि वकील व्यावसायिक विविध सुविधा वेळोवेळी प्राप्त करून देण्यासाठी सकरात्मक रित्या सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे मनोगत अँड. परिमल नाईक यांनी व्यक्त केले.
