Headlines

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नाणीजधाम पदयात्रा सावंतवाडीतून मार्गस्थ

संजू परब यांनी केले पदयात्रेचे स्वागत; जनजागृतीपर फलकांतून वृक्षसंवर्धन, निसर्गरक्षणाचा जागर..

⚡सावंतवाडी, ता. १३-: पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि निसर्गरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवित ‘श्री क्षेत्र गोवा ते श्री क्षेत्र नाणीजधाम’ पदयात्रा सावंतवाडी शहरातून मार्गस्थ झाली. या पदयात्रेचे शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. यावेळी पदयात्रेच्या वतीने संजू परब यांचा सत्कार करण्यात आला.

पदयात्रेत सहभागी भाविकांनी हातात विविध जनजागृतीपर फलक घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’ यासह वृक्षांचे महत्त्व, निसर्गसंरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणारे संदेश फलकांद्वारे देण्यात आले.
पारंपरिक वेशभूषेत महिला व पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक व पर्यावरणीय बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सावंतवाडी शहरवासीयांकडून कौतुक करण्यात आले.
पदयात्रेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. वृक्षसंवर्धन आणि निसर्गरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

You cannot copy content of this page