सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून नगरोत्थानमधून १० लाख रूपयांचा २०० केव्ही ट्रान्स्फार्मर सावंतवाडी नगरपरिषद हद्दीत मच्छिमार्केटजवळ मंजूर करण्यात आले होते. याचा शुभारंभ आज शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हा ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आला होता. याचा शुभारंभ आज करण्यात आला. आम. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला असून प्रभाग ६ साठी त्यांनी भरघोस निधी दिला आहे. यासाठी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी त्यांचे आभार मानत नळपाणी आणि गॅस पाईपलाईनच काम देखील ज्याठिकाणी पूर्ण झालं आहे त्याठिकाणी लवकरच हे रस्ते पुर्ववत होणार आहेत तसेच प्रभागातील सर्व गटारे,नाले बांधून बंदिस्त करणे व सोलर हायमास्ट, गल्ली मध्ये सर्वत्र ठिकाणी पथदिवे लावून परिसर प्रकाशमय होणार आहे यासाठी आमदार दीपकभाई केसरकर यांनी निधी उपलब्ध केला आहे अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ पेडणेकर,गटनेते बाबु कुडतरकर, शिवसेना महिला शहरप्रमुख भारती मोरे, नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सीमा नाईक, ॲड. सायली दुभाषी, कळसुलकर हायस्कूल अध्यक्ष शैलेश पै, महावितरण अभियंता वीणा मठकर, न.प. अधिकारी गौरव बुगड, संतोष गांवस, श्रेयस मुंज, गणेश कुडव, सागर मठकर, अक्षय शिरवलकर, वसंत सावंत, विशाल लाड, गौतम सावंत, राजेश पवार, विद्युत विभाग कंत्राटदार गौरेश सावंत,भास्कर आमुणेकर आदी उपस्थित होते.

