पाककला स्पर्धेत संध्या करंगुटकर प्रथम

⚡वेंगुर्ला ता.१३-:वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा, महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिलांसाठी पाककला घेण्यात आली. या स्पर्धेत संध्या करंगुटकर, रिया केरकर व स्नेहल बागायतकर यांनी क्रमांक पटकाविले.

साई मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी तालुका प्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, शहरसंफ प्रमुख भालचंद्र चिपकर, तालुका महिला संघटक सुकन्या नरसुले, उपजिल्हा संघटक श्वेता हुले, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राउुळ, माजी नगरसेविका सुमन निकम, शहर समन्वयक विवेक आरोलकर, उपशहर प्रमुख शैलेश परुळेकर, युवा उपशहर प्रमुख वैभव फटजी, प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.जाई नाईक तसेच अनन्या धावडे, शीतल साळगांवकर, वैशाली वडर, अपेक्षा बागायतकर, सायली पोखरणकर, श्रद्धा कुडाळकर, वैष्णवी वायंगणकर, कोमल सरमळकर, रश्मी गावडे, वंदना कांबळी, अंकिता केरकर, जस्मीन फणसोपकर, दिव्या नार्वेकर, हर्षदा तुळसकर, उर्मिला निरावडेकर, अरुणा मादिय, राधिका दळवी उपस्थित होते. 
सकाळच्या सत्रात महिला मेळावा घेण्यात आला. तर दुपारी गव्हाच्या  पीठापासून कोणताही पदार्थ बनविण्याची पाककला स्पर्धा घेण्यात आली. या पाककला स्पर्धेत संध्या करंगुटकर हीन प्रथम, रिया केरकर द्वितीय, स्नेहल बागायतकर तृतीय, उर्मिला निरावडेकर चतुर्थ तर वैष्णवी वायंगणकरने पाचवा क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे परिक्षण राधिका सकपाळ व गौरी मालवणकर यांनी केले. महिला बचतगटाच्या महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. लकी ड्राॅमध्ये राऊत, चिन्मयी परब, संध्या करंगुटकर, चिपकर विजेत्या ठरल्या. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
You cannot copy content of this page