Headlines

‘कोकणचा शाश्वत विकास’ विषयावर मालवणातचर्चासत्र ; सहभागाचे आवाहन

मालवण (प्रतिनिधी)

साथी किशोर पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्यातर्फे कोकणचा शाश्वत विकास या विषयावर रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजी
सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकणाचे निसर्ग सौन्दर्य आणि इथली नैसर्गिक संसाधने पर्यटकांच्या सोबतच विविध प्रकारच्या उद्योगांना कायम आकर्षित करतात. येणारे उद्योग आणि पर्यटकांचा वाढता ओघ कोकणासाठी फायद्याचा की दीर्घकालीन नुकसानीचा यावर सतत चर्चा आणि वादविवाद होत असतात. अशावेळी कोकणातील जैवविविधता कायम राखत इथे नेमके कुठले उद्योग आपल्याला हवे आहेत, शाश्वत पर्यटन ही संकल्पना काय आहे, मस्त्य दुष्काळ कसा हटवता येईल? काजू- आंबा फळ बागायतदारांचे प्रश्न काय आहेत? अशा काही मुद्द्यावर कोकणातील जाणत्या नागरिकांनी आपापसात बोलावे आणि काही एक धोरणात्मक दिशा नक्की करावी यासाठी हे चर्चासत्र आयोजित केले आहे.

या चर्चासत्रात डॉ केतन चौधरी, सुजय मोरे, डॉ सुमेधा नाईक, व्ही.के. सावंत हे विषयाची मांडणी करणार आहेत. तसेच यामध्ये : प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. सतिश लळीत, अभिजित हेगशेट्ये, ऍड. देवदत्त परुळेकर, मल्हार इंदुलकर, डॉ ज्योती बुआ तोरसकर, संदीप निंबाळकर, डॉ. राजेंद्र मुंबरकर, सुभाष लोमटे, डॉ.मनीषा गुप्ते, सुभाष वारे आणि अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी उपेंद्र टण्णू : 9881701881, लक्ष्मीकांत खोबरेकर : 9422946212 या व्हाट्सअप नंबरवर सहभाग निश्चित करावा, असे आवाहन एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे व बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page