Headlines

१५ ऑक्टोबरला सावंतवाडीत मोफत महाआरोग्य शिबिर…

पालकमंत्री नितेश राणे, सदानंद तानावडे यांची प्रमुख उपस्थिती: सर्व नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, भाजप प्रवक्ते तथा नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे यांचे नागरिकांना आवाहन..

⚡सावंतवाडी ता.१३-:
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ऑक्टोबरला सावंतवाडी जिंमखाना मैदान येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ सावंतवाडी शहरासोबतच तालुक्यातील गरजू रुग्णांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन भाजपाचे सावंतवाडी नगरपरिषदचे नगरसेवक तथा शहर प्रवक्ते सिद्धार्थ भांबुरे यांनी केले. ते येथील भाजप शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आवश्यक आरोग्य तपासण्याचे सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मळेवाड वेंगुर्ला बांदा आंबोली येथे या सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने पार पडलेल्या आरोग्य शिबिरामध्ये मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे नागरिकांनी सहभाग घेतला सावंतवाडी येथे 15 ऑक्टोबरला होणाऱ्या या शिबिरामध्ये अशाच प्रकारे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवावा. या मोफत आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची वैद्यकीय तपासणी व निदान ऑपरेशनची आवश्यकता असल्यास पुढील उपचाराचे नियोजन, तसेच शासनाच्या विविध योजनेखाली संबंधित रुग्णालयात उपचारासाठी मार्गदर्शन आधी केले जाणार आहे तसेच नेत्ररोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, कान नाक घसा,दंत रोग जनरल मेडिसिन, त्वचारोग, फिजीओथेरपी आधी उपचार या महा आरोग्य शिबिरामध्ये केले जाणार आहे.
या महारोग शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे स प्रभारी म्हणून प्रमुख पाहुणे सदानंद शेठ तानावडे उपस्थित राहणार आहेत तसेच भारतीय जनता पार्टी व सह्याद्री फाउंडेशन हे सुद्धा या शिबिरामध्ये सहकार्य करणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भांबुरे यांनी केले.
यावेळी नगरसेवक तथा शहर अध्यक्ष सुधीर आडीवरेकर महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेवक दिपाली भालेकर नगरसेवक दुलारी रांगणेकर, नगरसेवक सविता टोपले, नगरसेवक नीलम नाईक, नगरसेवक आनंद नेवगी दिलीप भालेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page