Headlines

गावडेवाडी बाजारपेठेत १७ ऑक्टोबरला नवरात्रोत्सवानिमित्त ‘ऑर्केस्ट्रा रिद्धिम स्टार’

दोडामार्ग : गावडेवाडी बाजारपेठ येथे नवरात्रोत्सवानिमित्त शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता ‘ऑर्केस्ट्रा रिद्धिम स्टार’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळेश्वर घुमट आरती मंडळ, दोडामार्ग यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावडेवाडी बाजारपेठ परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळणार आहे. श्री पिंपळेश्वर, श्री सातेरी देवी, श्री केळबाई आणि श्री हनुमान यांच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाविक व संगीतप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या माध्यमातून भाविकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार असून, परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे. सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची वेळ : शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६, रात्री ८ वाजता.

अधिक माहितीसाठी संपर्क : ७७७४९४७९१७ / ९०४९९८०७७०

You cannot copy content of this page