मालवण (प्रतिनिधी):

अल निनोच्या सावटाखाली संभाव्य तीव्र पाणीटंचाईचे संकट ओळखून मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ गोवेकरवाडीत थोरला व्हाळ येथे श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला.
पोलीस पाटील श्री. दशरथ गोवेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आनंदव्हाळ गोवेकर वाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आनंदव्हाळ – थोरला व्हाळ येथे ४५ फूट लांब आणि साडेतीन फूट उंचीचा बंधारा स्वतःच्या खर्चाने व स्व:कष्टाने यशस्वीरीत्या उभारला.
या कार्यात पोलीस पाटील दशरथ गोवेकर, अनंत नांदोस्कर, पपी गोवेकर, निलेश गोवेकर, संदीप गोवेकर, राकेश गोवेकर, भाऊ गोवेकर, विरेश नांदोस्कर, मंदार गोवेकर, उमेश गोवेकर आदी व इतर ग्रामस्थ सहभागी झाले होते.
