…तर राजकारण सोडायला तयार

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवींचे अनारोजिन लोबोना आव्हान

सावंतवाडी ता.१४-: दिपक केसरकर यांनी जर मला कोणतही शासकीय काम दिल आहे असेल तर अनोरोजीन लोबो यांनी जाहीर करावे मी लगेच राजकारण सोडायला तयार आहे असे खुले आवाहन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी लोबो यांना केले आहे.दरम्यान ज्या राष्ट्रवादीमुळे आज तुम्ही मोठे झालात त्यात राष्ट्रवादी पक्षावर तुम्ही टीका करता हे कर शोकांतिका आहे. असे दळवी म्हणाले.ते सावंतवाडी येथील राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना दळवी पुढे म्हणाले की जे बबन राणें स्वतःच्या गावात ग्रामपंचायत तसेच स्वतःच्या मुलाला निवडून आणून शकत नाय ते काय शिवसेना पक्षा चालवणार असा टोला ही त्यांनी यावेळी लगवाला दरम्यान दिपक केसरकर यांनी सावंतवाडीचा विकास केला ते जाहीर करा आणी उगाच टिका करून जनते मधून सानपदी मिळवण्याचा केवळ मला प्रयत्न सुरू असल्याचा फोन देखील त्यांनी यावेळी केला आहे.

यावेळी शहराध्यक्ष देवा टेंमकर,हिदायतुल्ला खान,चित्रा देसाई,सायली दुभाषी,पुजा दळवी, राकेश नेवगी, बाबल्या दुभाषी, याकुब शेख आदी होते.

You cannot copy content of this page